Monday, 16 April 2018

Will you buy Gold on this Akshay Trithiya ? Or start SIP ?

If you have bought Gold last 5 years on Akshay Trithiya your Return on Gold would be 3.46% on Investment.
Where as if you have Invested same amount in Equity Funds it would have been 15.47%

Let's understand through Example -

if you have Invested
₹1,20,000 (Every year) Last 5 Years in Gold on akshay Trithiya it became

Investment in Gold - ₹6,00,000/- (₹120000 × 5 Years)

Return on 5th Year- ₹6,54,000/- (Rate of Return - 3.46%)

If you have Invested the same ₹1,20,000 (Every year) last 5 years in Equity Funds* it became

Investment in Equity Funds*- ₹6,00,000/- (₹120000 × 5 Years)

Return on 5th Year- ₹8,83,577/- (Rate of Return - 15.47%)

*Equity Fund - (State Bank of India Bluechip Fund)

Conclusion - 
On same ₹6,00,000 Investment you are getting ₹54,000 Net Return in Gold but Net Return in Equity Funds is ₹2,83,577

Gold in not a an Investment Commodity anymore its working like a Hedging Commodity, have 5-10% Gold in portfolio not more than That.

so will you buy gold or Will you Start Sip on This Akshay Trithiya ?

Happy Akshay Trithiya in advance
💐💐💐💐

Jay Palshetkar (9773437783)
Global Investments

Image source - Google

Friday, 3 November 2017

How to Avoid Credit card Trap

Credit Card Trap

Its a ultimate convinient but complex loan Product. Vacation, big dinners or emergency may lure you to use Credit Cards but its not that simple Calculation.
This 'swipe happy' product can add imense debt to your Life.

How to Avoid Credit card Trap

Be Responsible - know your Credit card first. There are range of Cards offering diffrent Interest Rates, Fees and Rewards. Always chose the right Card for you.

Nothing is Free - do you think Banks are fool to give you Free Credit? Many credit card gives upgrade to higher version Card with More Credit, More Rewards (More Traps) so be cautios dont take higher version card unless needed.

Fees on urgent cash - in case emergency u may consider to encash your Credit Card In ATM remember if you use credit card in ATM they charge Fees On same.

Remember the Paymemt date - Many people unable to pay debt on time and Game starts!

Interest rates on Credit Card is  around 2.5 % to 3.5% (Yes 42% Annually)

and Interest is charged on entire amount payable (Can you Imagine?)

And Interest is charged from the date of purchase (What?)

And there is Late fees also charged (Hdfc bank charges around ₹500-700/-)

And if you unable to pay further all your Reward points get down to zero!

So congratulations your Doomed to Hell !

Make sure you pay the bill on time and not with minimum payment monthly. 

Credit Card is a emergency not luxury -
I know Card look sexy, you might want to floant them in front of your friends but please remember Credit card are not proved very good Friend for people. They are made for emergency not luxury.

Conclusion- Do shopping when you have money, postponed your satisfactions and if you dont really require credit then do not take Credit Card at First place.

Give me your Comments on Credit Card, what do you think?

Plan to be Rich

Jay Palshetkar (9773437783)
Global Investments

Tuesday, 24 October 2017

"2 Or 66, Which one is better?"


While Investing do not concentrate on Return on Investment, focus on duration of the Investment.

Lets undertand with example

Investment- ₹1 lakh
Duration - 5 years
Rate of Return- 15%

- On Maturity amount will be ard ₹ 2 lakhs
(Rutrun is 2 Times over Investment)

Investment- ₹1 lakh
Duration - 30 years
Rate of Return- 15%

- On Maturity amount will be ard ₹ 66 lakhs
(Rutrun is 66 Times over Investment but Rate of Return is same)

It happens due to 'Power of  Compouding Interest'

Try to keep Money invested for Long term, compounding will definitely help.

Jay Palshetkar
Global Investments

Sunday, 3 September 2017

तुम्हाला जर आपल्या गुंतवणुकीवर चांगला आणि सुरक्षित परतावा मिळवायचा असेल तर पुढील प्रश्न स्वतःला गुंतवणुक करण्याआधी विचारा (भाग १)

जय पालशेतकर (9773437783)
ग्लोबल इन्वेस्टमेंट

सतीश आपल्या ऑफिस मधील मित्रांना प्रमोशनची पार्टी देत होता.

सतीश चा एक खास मित्र -  "मग वाढलेल्या पगारांच काय करणार आहेस?"

सतीश - "अजून काही विचार केलेला नाही पण गुंतवणूक करायचा विचार करतोय"

सतीश चा मित्र - "काय बोलतोस, अरे माझा भाऊ आत्ताच कोणत्यातरी इन्शुरन्स कंपनीत जॉईंट झाला आहे. आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडेच गुंतवणूक केलेली आहे तू पण टाक एखाद्या पोलिसी मध्ये पैसे, माझा भाऊ तुला त्याला मिळणाऱ्या कमिशन मधून पण काही पैसे तुला परत देईल."

सतीश उत्साहित होऊन-  " ग्रेट, उद्या त्याला भेटायला सांग मी तू गुंतवणूक केलेल्या पोलिसीतच पैसे गुंतवणूक करतो!

सतिशचा मित्र - ओके नक्कीच !

वरील सतीशचे उदाहरण आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. आपण गुंतवणुकीचे धडे कुणाकडनाही घेतो आणि मग चढाओढ सुरु होते ती वेगवेगळे गुंतवणूक प्रॉडक्ट घ्यायची.

मी मागच्या महिन्यात एका गृहस्तांकडे  रिटायरमेंट प्लान्निंग साठी गेलो होतो त्यांनी आधी 18 गुंतवणूक पॉलिसी घेतल्या होत्या आणि तरी सुद्धा ना धड ते नीटपणे प्रोटेक्टेड (इन्शुरंस) होते ना गुंतवणूक नीट होती. 'एक ना धड बारा भर चिंध्या' अशी त्यांची अवस्था होती.

लक्षात घ्या तुमच्या कडे गुंतवणुकीसाठी किती पैसे आहेत याहून महत्वाचे आहे कि तुम्ही कुठे गुंतवणूक करत आहात ! 

तुम्हाला जर आपल्या गुंतवणुकीवर चांगला आणि सुरक्षित परतावा मिळवायचा असेल तर पुढील प्रश्न स्वतःला गुंतवणुक करण्याआधी विचारा

1. माझ्या गुंतवणुकीचा उद्देश (इन्वेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह) काय आहे ?

'मुलीच शिक्षण, नवीन घर, नवीन गाडी, किव्वा लवकर रिटायरमेंट' गुंतवणुकीचा उद्देश सर्वात महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही हे गुंतवणुकीचे कष्ट घेत आहात.

जर तुम्ही गुंतवणुकीला उद्देश दिला नाहीत तर जेव्हा पण जीवनात गरज निर्माण होईल तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घ्याल त्यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणतीही मोठी स्वप्ने पूर्ण होणार नाहीत आणि आपले आयुष्य कर्ज फेडण्यात जाईल.

टीप- गुंतवणूक करताना तिला वेगवेगळे उद्देश (इन्वेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह) प्रमाणे वर्गीकरण करून करा नक्कीच फायदा होईल.

2. मी पैस्याची बांधिलकी पाळू शकेन का ?

तुम्ही एकदाच गुंतवणूक किव्वा दर महिन्याला गुंतवणूक करत असाल पण तुम्ही ती बांधिलकी पाळू शकणार आहात का ? कि आज मित्र गुंतवणूक करतोय म्हणून तुम्ही गुंतवणूक करताय!

टीप- गुंतवणूक करताना तुमचे महिन्याचे खर्च तसेच आणीबाणीचा (EMERGENCY) खर्च बाजूला काढून नंतरच गुंतवणूक करा!

3. मला माझा उद्देश पूर्ण करण्यासाठी किती गुंतवणुक करावी लागेल?

प्रत्येकाला असे वाटते कि आपण आपल्या मुलांना डॉक्टर किव्वा इंजिनिअर बनवावे पण आज शिक्षण महाग होत चालले आहे.

समजा तुम्हाला जर मुलांचा शिक्षणाचा खर्च इथून 15 वर्षांनी 50 लाख येणार आहे
मग तुम्हाला तुमची मुलांसाठी केलेली गुंतवणुक 15 वर्षांनी किती रुपये मिळवून देणार आहे हे माहिती नको का ?

टीप- प्रत्येक गुंतवणूक उद्देशाला पडताळून पहा कि तुमचा उद्देश हा किती कॉस्टली आहे आणि तुमची गुंतवणूक तुम्हाला तेवढे पैसे मिळवून देणार आहे  कि नाही?

4. माझी रिस्क प्रोफाइल काय आहे?

बरीचशी लोक शेअर मार्केट वाढायला लागले कि आकर्षित होऊन गुंतवणूक करतात आणि शेअर मार्केट खाली यायला लागले कि शेअर मार्केट बरोबर त्यांचे ब्लड प्रेशर सुद्धा वरती खाली व्हायला लागते, सांगायची गोष्ट म्हणजे
प्रत्येक माणसाची रिस्क घेण्याची क्षमता वेगवेगळी असते.

टीप- फक्त रिटर्न पाहून गुंतवणूक करू नका, गुंतवणुक करताना स्वतःची आर्थिक परिस्थिती, आपला उद्देश व आपली रिस्क घेण्याची ताकद यावर गुंतवणूक प्रॉडक्ट निवडा.

5. माझा फिनॅनसिएल Advisor तेवढा क्षमतेचा आहे का?

भरपूर लोक आज गुंतवणूक करतात कोणाच्या संगण्यांने तर मित्र, काका, मामा, बाबा किव्वा दादा! आज या व्यक्ती वाईट नाहीत पण प्रत्येकाच्या क्षमता व अपेक्षा वेगवेगळ्या आहेत.

काही लोंकाकडे आपले फिनॅनसिएल Advisor आहेत. पण त्यांच्यावर आपला आंधळा विश्वास बरोबर आहे का ? आपण त्याची क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का?
लक्षात घ्या तुम्हाला चांगलं पोहायला येण्यासाठी तुमचा प्रशिक्षक पट्टीचा पोहणाराच असला पाहिजे.
मी मानतो कि आपली गुंतवणुकीची  ताकद हि आपल्या Advisor च्या ताकदीवर डिपेंड असते.

टीप- आपण आपल्या फिनॅनसिएल Advisor ला विचारले आहे का कि तो जी गुंतवणूक आपल्याला सुचवत आहे त्यात त्याने स्वतःची किती गुंतवणूक केली आहे? त्याची सिप, गुंतवणूक व इन्शुरन्स पोलिसिझ किती आहेत? त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे?

वरील प्रश्न आपल्या Advisor ला गुंतवणूक करण्या आधी विचारा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

पुढील प्रश्न नंतरच्या भागात पाहू !

प्रतिक्रिया नक्की कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा ! 

Plan to be rich ! 

Saturday, 12 August 2017

तुमचा Mediclaim आहे का ? किव्वा Mediclaim घेणार आहात का ? (भाग २)

जय पालशेतकर (9773437783)
ग्लोबल इन्वेस्टमेंट

Mediclaim घेताना काय काळजी घेतली पाहिजे तर खालील बाबी जाणून घ्या!
मागच्या भागात आपण 4 बाबी पाहिल्या आता पुढील 3 बाबी पाहू

5. Exclusions ?

√Mediclaim घेताना बऱ्याच लोक्कांना काय कव्हर होईल या बाबत माहिती होते पण बहुतेकांना काय कव्हर होणार नाही या बाबत काहीहि माहिती नसते.

√Exclusions म्हणजे अशा गोष्टी ज्या पॉलिसी मध्ये कव्हर होत नाहीत.

√Exclusions मध्ये 2 प्रकार असतात स्थायी (Permanent) आणि तात्पुरता (Temporary).

√स्थायी Exclusions- जवळपास सर्व पॉलिसी मध्ये स्थायी Exclusions त्याच त्याच असतात.

√तात्पुरताचे Exclusions- काही exclusions हे काही काळापुरता असतात जसे कि "पॉलिसी मध्ये Catract Operation पहिली 2 वर्षे कव्हर होणार नाही". काही पॉलिसीज मध्ये कधी कधी काही वेगळे Exclusions असू शकतात.

√Conclusion-
प्रत्येक पॉलिसीमध्ये स्थायी (Permanent) आणि तात्पुरता (Temporary) exclusions असतात.  त्याची पूर्णपणे कल्पना तुम्हाला असणे फार महत्वाचे आहे.

पॉलिसी आल्या नंतर  तुम्ही exclusions व इतर गोष्टी (पॉलिसी Wordings) पूर्णपणे वाचून घ्या. जर तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही 15 दिवसाच्या आत पॉलिसी परत करु शकता. इन्शुरन्स कंपनी बिनशर्त तुमचे सर्व पैसे परत करते.

6. Renewability वय ?

√आज अद्यावत वैद्यकीय सेवा व औषधे यामुळे आज भारतात जगण्याची वयोमर्यादा फार वेगाने वाढते आहे. त्यामुळे आज आपण मोठं म्हातारपण (साठीनंतर जास्त वर्षे) जगणार आहोत आणि Mediclaim ची सर्वात जास्त गरज हि आपल्याला म्हातारपणातच असते.

√Mediclaim घेताना Renewability वय जाणून घेने फार महत्वाचे आहे.
Renewability वय म्हणजे किती वर्षा पर्यंत तुम्ही तुमचा Medicliam चालू ठेवू शकता. जर त्यावर काही वयाची अट असेल तर तुम्ही म्हातारपणात तुमचा Mediclaim चालू ठेऊ शकणार नाहीत.
आणि ते तुमच्यासाठी फार घातक आहे.
कारण mediclaim ची सर्वात जास्त गरज हि त्यावेळीच असते.

√तेव्हा पुढच्या वेळी Mediclaim घेताना renewable वय नक्की विचारून घ्या

√Conclusion-
Mediclaim घेतांना तो 'Lifetime Renewable' आहे का हे तपासून घ्या. Renewability वयाची कोणतीही अट नसणारा mediclaim घेणेच उत्तम ! त्यामुळे तुमचं कव्हर म्हातारपणात नक्कीच कामाला येईल.

7. पूर्व (Pre- Existing) आजार ?

√बहुतेक Medicliam पोलिसीज ह्या पूर्व आजारांना (Pre-existing diseases) लगेच कव्हर करत नाही त्यामध्ये 2 ते 3 वर्ष वाट पाहण्याची अट असते.

√पण लक्षात घ्या कि पूर्व आजार म्हणजे फक्त ते आजर नाहीत जे तुम्हाला Mediclaim घेताना असतात, पूर्व आजारात तेही आजार मोडतात जे तुम्हाला Medicliam घेतल्या नंतर झालेले आहेत पण ते पूर्व आजारांवर अवलंबून आहेत.

√खालील उदाहरण लक्षात घ्या !

√उदाहरण-
सतीश ला 'मधुमेह' आहे. सतीश ची पॉलिसी 'पूर्व आजार' 2 वर्षांनी कव्हर करते म्हणजे ती 'मधुमेह' 2 वर्षांनी कव्हर करणार, हे सतीश ला मान्य आहे. पोलिसी घेतल्या नंतर एका वर्षांनी सतीशच्या जास्त मधुमेहामुळे त्याला किडनी प्रॉब्लेम झाल्याचे समजले.

√पण किडनी प्रॉब्लेम हा पूर्व आजार 'मधुमेह' वर अवलंबून असल्यामुळे तो पूर्व आजार म्हणूनच पकडला जातो. त्यामुळे Medicliam पॉलिसी हि मधुमेह व किडनी प्रॉब्लेम दोघाना 2 वर्षांनीच कव्हर करते. त्यामुळे 1 वर्षांनी झालेल्या या आजाराला सतीशला medicliam मधून काहीहि मदत होणार नाही.

√Conclusion-
Mediclaim निवडताना फार महत्वाचे आहे कि तुम्ही असा Medicliam निवडा जो पूर्व आजारांना (Pre-existing diseases) लवकरात लवकर कव्हर करेल.

√तर या 7 फार महत्वाच्या बाबींवर विचार करूनच Mediclaim घ्या. फक्त कमी प्रीमियम किव्वा वेगवेगळ्या ऑफर्स यांना भाळून कोणताही medicliam घेऊ नका.

तुम्हाला लेख कसा वाटला? प्रतिक्रिया नक्की कळवा !

http://jaypalshetkar.blogspot.in/2017/08/mediclaim-mediclaim.html?m=1

मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

http://jaypalshetkar.blogspot.in/2017/08/mediclaim-mediclaim-7.html?m=1

Tuesday, 1 August 2017

तुमचा Mediclaim आहे का ? किव्वा Mediclaim घेणार आहात का ? (भाग १) तर या 7 गोष्टी लक्षात ठेवा !

जाहिराती, ऑनलाइन बाजार, आणि शिक्षणामुळे आजकाल बरीच लोक जागरूक झालेली आहेत. आज Mediclaim (हेल्थ इन्शुरंस) घेण्याकडे कल वाढत चाललेला आहे.

आता प्रत्येक Mediclaim कंपनी आपलं प्रॉडक्ट चांगले आहे असेच म्हणणार मग कोणता Mediclaim घ्यावा, कोणता घेऊ नये?

Mediclaim घेताना काय काळजी घेतली पाहिजे तर खालील बाबी जाणून घ्या!

1. पोलिसी Individual कि Floater ?

√ Mediclaim हा 2 मुख्य प्रकारात मोडतो तुम्ही पोलिसी Indivaidual म्हणजे एकटयाच्या नावे किव्वा Floater म्हणजे कुटुंबामधील सर्व लोकांच्या नावाने घेउ शकता.

√ Floater पोलिसी घेताना इन्शुरन्स कंपनी हि कुटुंबातील मुख्य किव्वा वयांने सर्वात जास्त असणाऱ्या व्यक्तिच्या नावाने ती पोलिसी इशु करते. तिला प्रायमरी पर्सन असे म्हणतात.

√ पण सर्वात महत्वाची गोष्ट जर कुटुंबातील ती मुख्य व्यक्ती काही कारणांनी दगावली किव्वा Specific Age लिमिट ला पोचली तर Floater पोलिसी बंद होते. ह्या floater पॉलिसी मध्ये असलेली इतर व्यक्ती या पॉलिसीला परत चालू ठेवू शकत नाहीत.

√ Floater पॉलिसी मध्ये जर लहान मुले असतील तर ती त्या पॉलीसी मध्ये आपल्या वयाच्या 21-25 वर्षापर्यंतच राहू शकतात नंतर त्यांना वेगळी पोलिसी घेणे भाग आहे.

√ Individual पॉलिसी हि व्ययक्तीत असल्यामुळे तिचा इतर लोकांशी समंध येत नाही.

Conclusion- फक्त प्रीमियम कमी पडते म्हणून Individual किव्वा Floater पॉलिसी निवडू नका. नीट पडताळा करा अथवा Advisor ची मदत घ्या.

2. Sub- लिमिट ?

√ काही पॉलिसी मध्ये रूमचे भाडे, डॉक्टर चार्जेस किव्वा रोगांवर Sub लिमिट म्हणजे मर्यादा असतात.

√ उदाहरण-
रुपेश ची 5 लाखाची Mediclaim पॉलिसी आहे पण रूम रेन्ट हे 1% दिलेले आहे. म्हणजे आता रुपेश हॉस्पिटल मध्ये 5 लाखाच्या 1% म्हणजे ₹ 5000 चीच रूम वापरू शकतो. पण त्याला जर उपचारासाठी ₹ 12000 रुपयाची रूम वापरावी लागली तर त्याला पॉलिसी मधून रूमसाठी दिवसाला ₹ 5000 रुपयेच मिळतील बाकी त्याला स्वतः खर्च करावे लागतील.

√ अशाच Sub लिमिट (मर्यादा) कदि कदी काहि रोगांवरही असतात.

Conclusion-
पॉलिसी किती रुपयाची आहे हे महत्वाचे आहे पण Sub लिमिट आहेत का ते आधी जाणून घ्या.
Sub लिमिट असलेल्या Medicliam पॉलिसी शक्यतो टाळा!

3. ऑफिस Mediclaim?

√ "तुमचा Mediclaim आहे का ?" अस विचारल्यावर बरीच नोकरी करणारी लोक "हो" म्हणून उत्तर देतात. कारण असते कि कंपनी तर्फे दिला जाणार mediclaim !

√ कंपनी तर्फे Mediclaim असण्यात काही तोटे आहेत ते लक्षात घ्या !

√ जेव्हा आपण एखादी Mediclaim पोलिसी 3 वर्षांहून अधिक वापरतो तेव्हा तिचे खरे फायदे आपल्याला मिळतात. जसे आपल्याला आधीपासून असलेले आजार कव्हर होतात, तुम्ही जर क्लेम नाही केलत तर तुम्हाला नो क्लेम बोनस म्हणजे तुमचे Mediclaim कव्हर वाढते.

√ पण नॉर्मली माणूस एका कंपनीत सादारणतः 3-4 वर्षे काम करतो. त्यामुळे त्याचे पूर्व आजार कव्हर होतच नाहीत. तसेच त्याला 'नो क्लेम बोनसचा फायदा घेता येत नाही. कंपनी तर्फे असणाऱ्या mediclaim मध्ये बहुतेकदा कॉ पेमेंट (पुढाचा मुद्दा पहा*) असते आणि सर्वात मोठे नुकसान म्हणजे आपल्या रिटायरमेंट च्या काळात आपल्याला मोठे कव्हर घेणे खूप खर्चिक होते.

Conclusion-
ऑफिस मधील medicliam वाईट नक्कीच नाही पण तुम्ही स्वतःला विचारा  कि तुम्ही किती वर्ष कंपनीत थांबणार आहात जर उत्तर जास्तीत जास्त 3-4 वर्षे असेल तर स्वतःचा mediclaim काढणे कधीही उत्तम!

4. कॉ पेमेंट ?

√ कॉ-पेमेंट हा ऑप्शन पाहणे फार महत्वाचे आहे. बहुतेकदा हा ऑप्शन आपण जेथे नोकरी करतो त्या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या Mediclaim पॉलिसी मध्ये आढळतो. कॉ पेमेंट मध्ये % दिलेले असतात

√ कॉ पेमेंट मध्ये इन्शुरंस कंपनी पूर्ण क्लेम कधीच देत नाही ती काही % मध्ये क्लेम देते बाकी रक्कम ज्यांनी mediclaim घेतला आहे (Insured) त्याला भरावी लागते.

√ उदाहरण- अजय ने 20% कॉ पेमेंट असलेला mediclaim खरेदी केला व त्याचे इन्शुरन्स कव्हर 3 लाखाचे होते. त्याच वर्षात त्याला अपघात झाला व खर्च 2 लाख रुपये झाला पण इन्शुरन्स कंपनी त्याला पूर्ण क्लेम देणार नाही कारण कॉ पेमेंट आहे 20% !

√ त्याला कंपनीकडून जास्तीतजास्त 1 लाख 60 हजार रुपये मिळतील (2 लाख X 20%) बाकी 40 हजार रुपये त्याला स्वतः भरावे लागतील. 

Conclusion-
कॉ पेमेंट असलेला Mediclaim हा स्वस्त असतो पण उद्या मेडिकल ट्रीटमेंट ला किती खर्च येईल सांगता येणार नाही.  त्यामुळे Mediclaim निवडताना कॉ पेमेंट न घेतलेलं चांगले.

पुढील 3 बाबी आपण पुढच्या भागात वाचू

Sunday, 18 June 2017

SIP ची पॉवर कशी वाढवायची ? (भाग २)

बरेचदा आपण लहान SIP नि सुरुवात करतो व विचार करतो कि नंतर वाढवू कि   SIP, कुठे घाई आहे?

पण आपल्याला वेल्थ जमवण्यासाठी चक्रवाढ व्याजाची (कंपाऊंड इंटरेस्ट) गरज असते मागच्या भागात आपण, चक्रवाढ व्याज कसे काम करते यावर काही उदाहरणे पहिली, चला आणखी काही उदाहरणे पाहूया !

समजा तुमच्या रिटायरमेंट ला 30 वर्षे बाकी आहेत, खालील उदाहरणे पहा !

उदाहरण १

पहिल्या 10 वर्षात तुम्ही 5000 ची SIP केलीत, 10 वर्षानंतर वाढवून ती 15000 केलीत व त्यानंतर 10 वर्षांनी 50000 प्रति महिना SIP तुम्ही इनवेस्ट करताय !

5000 SIP पहिली - 10 वर्षे
15000 SIP नंतरची- 10 वर्षे
50000 SIP नंतरची - 10 वर्षे
(परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 84 लाख रुपये)

उदाहरण २

तुम्ही 10000 रुपयाची SIP 30 वर्षे सुरु ठेवलीत.

10000 SIP- संपूर्ण 30 वर्षे
(परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 36 लाख रुपये)

उदाहरण ३

तुम्ही 14000 ची SIP पहिल्या फक्त 10 वर्षांसाठी केलीत व नंतर ती बंद करून, जमारक्कम तशीच 30 वर्षापर्यंत वाढू दिलीत.

14000 SIP पहिली- 10 वर्षे
(परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 16 लाख 80 हजार रुपये)

आपण वरील सर्व उदाहरणात पहिले कि जवळपास 6 करोड रुपये जमा होत आहेत परंतु गुंतवणूक जर पडताळून पहिली तर लक्षात येईल कि गुंतवणुकीत जमीन - आस्मानाचा फरक आहे.

आता गुंतवणुकीत हा एवढा फरक का आला तर उत्तर सोप्पे आहे तुमची पहिली 10 वर्षे गुंताणूकी साठी सर्वात महत्वाची आहेत कारण या पहिल्या 10 वर्षाच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त चक्रवाढ व्याज तयार होते.

तुम्ही पहिल्या 10 वर्षात जर लहान SIP केलीत तर ती भरून काढण्यासाठी भरपूर मोठी SIP गुंतवणुकीचा भूर्दंड तुम्हाला नंतरच्या वर्षात भरावा लागेल.

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला वरील कोणत्या उदाहरणाप्रमाणे गुंतवणूक करायची आहे ! बाकी श्री (चक्रवाढ व्याज) समर्थ आहे !

प्रतिक्रिया नक्की कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा ! 

Plan to be rich !