Sunday, 18 June 2017

SIP ची पॉवर कशी वाढवायची ? (भाग २)

बरेचदा आपण लहान SIP नि सुरुवात करतो व विचार करतो कि नंतर वाढवू कि   SIP, कुठे घाई आहे?

पण आपल्याला वेल्थ जमवण्यासाठी चक्रवाढ व्याजाची (कंपाऊंड इंटरेस्ट) गरज असते मागच्या भागात आपण, चक्रवाढ व्याज कसे काम करते यावर काही उदाहरणे पहिली, चला आणखी काही उदाहरणे पाहूया !

समजा तुमच्या रिटायरमेंट ला 30 वर्षे बाकी आहेत, खालील उदाहरणे पहा !

उदाहरण १

पहिल्या 10 वर्षात तुम्ही 5000 ची SIP केलीत, 10 वर्षानंतर वाढवून ती 15000 केलीत व त्यानंतर 10 वर्षांनी 50000 प्रति महिना SIP तुम्ही इनवेस्ट करताय !

5000 SIP पहिली - 10 वर्षे
15000 SIP नंतरची- 10 वर्षे
50000 SIP नंतरची - 10 वर्षे
(परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 84 लाख रुपये)

उदाहरण २

तुम्ही 10000 रुपयाची SIP 30 वर्षे सुरु ठेवलीत.

10000 SIP- संपूर्ण 30 वर्षे
(परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 36 लाख रुपये)

उदाहरण ३

तुम्ही 14000 ची SIP पहिल्या फक्त 10 वर्षांसाठी केलीत व नंतर ती बंद करून, जमारक्कम तशीच 30 वर्षापर्यंत वाढू दिलीत.

14000 SIP पहिली- 10 वर्षे
(परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 16 लाख 80 हजार रुपये)

आपण वरील सर्व उदाहरणात पहिले कि जवळपास 6 करोड रुपये जमा होत आहेत परंतु गुंतवणूक जर पडताळून पहिली तर लक्षात येईल कि गुंतवणुकीत जमीन - आस्मानाचा फरक आहे.

आता गुंतवणुकीत हा एवढा फरक का आला तर उत्तर सोप्पे आहे तुमची पहिली 10 वर्षे गुंताणूकी साठी सर्वात महत्वाची आहेत कारण या पहिल्या 10 वर्षाच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त चक्रवाढ व्याज तयार होते.

तुम्ही पहिल्या 10 वर्षात जर लहान SIP केलीत तर ती भरून काढण्यासाठी भरपूर मोठी SIP गुंतवणुकीचा भूर्दंड तुम्हाला नंतरच्या वर्षात भरावा लागेल.

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला वरील कोणत्या उदाहरणाप्रमाणे गुंतवणूक करायची आहे ! बाकी श्री (चक्रवाढ व्याज) समर्थ आहे !

प्रतिक्रिया नक्की कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा ! 

Plan to be rich ! 

Wednesday, 7 June 2017

SIP ची पॉवर कशी वाढवायची ? (भाग १)

भरपूर लोक मला विचारतात कि म्युच्युअल फंडमध्ये SIP गुंतवणूक किती केली पाहिजे कधी वाढवली पाहिजे, कधी कमी किव्वा बंद केली पाहिजे ?

पहिले नॉर्मली लोक कसे SIP करतात हे समजून घेऊ?

बहुतेकदा लोक म्युच्युअल फंड मध्ये SIP गुंतवणूक सुरुवात करताना एक लहान SIP नि सुरुवात करतात हळू हळू एक 5 वर्षात थोडी थोडी SIP वाढवतात. ज्यांना 10 वर्षांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा अनुभव आहे त्यांचा विश्वास पक्का झालेला असतो आणि आज ते फार अधिक प्रमाणात किव्वा आग्रेसिव्हलि SIP व गुंतवणूक करतात.

पण यात काही चूक आहे का ?

हो आहे, एक खुप मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे चक्रवाढ व्याज (Compound Interest)

खालील उदाहरण पहा !

समजा अजय याने 1000 रुपयाची SIP सुरु केली व ती पुढच्या 30 वर्षांसाठी चालू ठेवली.
तर 15% परताव्याप्रमाणे त्याची रक्कम 30 वर्षाच्या शेवटी 56,00,000 ( ५६ लाख) इतकी होईल. (इन्वेस्टमेंट- 3,60,000)

आता विजय चे उदाहरण पाहू !

समजा विजय याने 2000 रुपयाची SIP सुरु केली व ती पुढच्या फक्त 10 वर्षांसाठी चालू ठेवली, 10 वर्षानंतर ती जमलेली गुंतवणूक रक्कम पुढची 20 वर्ष  फक्त तशीच वाढू दिली.
तर 15% परताव्याप्रमाणे त्याची रक्कम 30 वर्षाच्या शेवटी 86,00,000 ( ८६ लाख) इतकी होईल. (इन्वेस्टमेंट - 2,40,000)

अजय याने विजय पेक्षा 20 वर्ष जास्त इन्वेस्टमेंट केली, 1,20,000 रुपये जास्त गुंतवणूक केले तरी सुद्धा विजयचा परतावा अजयपेक्षा 30,00,000 रुपयांनी जास्त आहे.

असे का झाले?

"भाई ये सब कमाल चक्रवाढ व्याज (Compond Interest) का हे !"

चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज, जेव्हा आपण SIP करतो तेव्हा पहिल्या 10 वर्षात केलेली इंवेसेन्टमेंट सर्वात जास्त चक्रवाढ व्याज कमावते आणि बाकीची 20 वर्षातील SIP हि फार कमी चक्रवाढ व्याज कमावते त्यामुळे हा रिसल्ट येतो.

मग आपण काय केले पाहिजे ?

फक्त SIP केली, खूप वर्षासाठी केली म्हणून आपला रिटर्न वाढणार नाहि तर सुरुवातीच्या काळात आपण किती SIP करतो यावर आपण लक्ष दिले पाहिजे!

जर तुमच्याकडे रिटायर होण्यासाठी 30 वर्षे शिल्लक आहेत तर लक्षात ठेवा, त्यातील पहिली 10 वर्षे इन्वेस्टमेंटच्या दृष्टीने सर्वात महत्वाची आहेत.

अर्थात खेचून ताणून SIP नक्कीच करू नका पण जमत असेल तर नक्कीच विचार करा!

प्रतिक्रिया नक्की कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा ! 

Plan to be rich !