Thursday, 30 March 2017

माझी स्वप्ने

आई शपथ, ती रेड XUV 500 पाहिलीस का? ड्रीम कार आहे यार आपली !

माझं ना एक स्वप्न आहे साऊथ मुंबई मध्ये एक मोठं घर असावं !

आयफेल टॉवर किती उंच असेल रे, एकदा ना पाहायला जायचंय पॅरीसला!

लॉंग टूर ला जायचंय बाईकवर लडाखला, काय धमाल येईल नाही !

हजारो ख्वाईशे ऐसी के हर ख्वाईश पे दम निकले ।
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले ।

आपल्या स्वप्नांची लिस्ट फार मोठी आहे. पण खेदाची बाब वाटते कि भरपूर जण स्वप्न पाहतात पण फार कमी लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करतात.

बहुतेक जण स्वप्न पाहतात पण ती स्वप्नच राहतात.

पण ड्रीम पूर्ण करणार्यांमध्ये सुद्धा 90% लोक आहेत जे आपल्या लाईफ मधील 1 किव्वा  जास्तीत जास्त 2 स्वप्न पूर्ण करतात.

उदाहरण म्हणजे भरपूर जण एक 2BHK घर आणि 1 कार यामध्ये आयुष्य संपवून टाकतात.

आज आपल्या आदींच्या पिढीच काय झालं ?
ते कोणी घरी पाहुणे आल्यावर काय सांगतात? 

"बघा हे घर त्यावेळी घेतलं म्हणून नाही तर आता काय घेणार होतो !" विषय घरापासून सुरु होतो आणि तिथेच संपतो.

तुम्हाला पण तेच करायचे आहे का?

आपण घर आणि गाडी पर्यंत का थांबायचं ?

जरा विचार करा आपण जर फक्त आपली 1 किव्वा 2 स्वप्ने पूर्ण केली तर आपण खुश राहु शकू का?
लाईफ जगल्यासारखी वाटेल का?

अस का होत?

आपण स्वप्नांना गोल्स मध्ये कन्व्हर्ट करत नाही, प्लॅन करत नाही.

आपण गोल प्लॅनिंग करत नाही त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि पैशे हे वाया जातात.
गोल प्लान्निंग मद्ये प्रोसेसला फार महत्व आहे पण आपण आपले डिसिजन इमोशनल घेतो त्यामुळे चुकी करून बसतो.

सिम्पल आहे तुम्हाला जर दादरला उतरायचे आहे आणि तुम्हाला झोप लागली आणि तुम्ही जर CST ला उतरलात तर परत तिकिट काढावे लागेल व वेळहि वाया जाईल. पैसाभि गया ओर टाईम भी !

लक्षात ठेवा !

Dreams without planning are just a Dreams !

तुम्हाला काय वाटते ? प्रतिक्रिया कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !

Plan to be rich !

Wednesday, 22 March 2017

IPO .. आला रे आला !

किती लागले रे तुला D Mart चे Shares?

शीट यार घ्यायला पाहिजे होते Shares!
माझ्या मित्राने किती पैशे छापले ?

काय जबरदस्त ना ! पहिल्याच दिवशी डबल झालेे पैशे ! आता कोणता IPO येतोय ?

माझ्या प्रिय मित्रांनो सध्या वरील प्रश्नांना पेव फुटला आहे, पण IPO म्हणजे खरच पैशे छापायची मशीन किव्वा ट्रिक आहे का?

तर उत्तर आहे ' हो '

खरच ! हि पैशे छापण्याची मशीन आहे किव्वा ट्रिक आहे पण काही बोगस कंपन्यांच्या  प्रोमोटर्सची ! (अफकोर्स सगळ्या कंपनिज बोगस नसतात)

D MART नि नो डाऊट चांगली ओपनिंग दिलि पण लक्षात घ्या सगळेच IPO (कंपनिज प्रोमोटर्स) चांगले नसतात !

खुप IPO फेलही जातात 2005 ते 2010 दरम्यान आलेले 50% पेक्षा जास्त IPO फेल गेले ! 

सर्वात महत्वाचा प्रश्न हा आह कि,
IPO - IPO खेळून आपण श्रीमंत होणार आहोत का?

तर उत्तर आहे ' नाही ' कस काय?

1. IPO मद्ये आपण वैयक्तित गुंतवणूक लिमिटेड करू शकतो म्हणजे 15000-25000/ लॉट. त्यामुळे होणारा फायदा हा लिमिटेड असतो.

2. चांगल्या कंपनीत जास्त लॉट जरी apply केले तरी ते मिळत नाहीत कारण खूप लोक apply करतात, त्यामुळे नॉर्मली कंपनी कमीच shares देते.

3. IPO हे एक्टिव इनकम आहे ज्यामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागतो. हि फुल प्रूफ STARTEGY नाही.

4. सर्वात महत्वाचं IPO हे कंपोउंडिंग रिटर्न देत नाहीत. (बरीच लोक त्यांना ओपनिंगच्या दिवशीच विकतात)

5. IPO वर शॉर्टटर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो.

समजून घ्या IPO मध्ये पैशे टाकून काढणे हे एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग चा प्रकार आहे, त्यामुळे जसे पैशे येऊ शकतात तसे  जाऊ हि शकतात.
ट्रेडिंग फुल्ल टाईम करणार असाल तर नक्की फायदा आहे पण जर दुसरा जॉब किव्वा बिझनेस करताय तर मग मार्ग कठीण आहे.

पैशे खेळणे आणि श्रीमंत होने यात एकच फरक आहे तो म्हणजे प्लान्निंग चा !

तुम्हाला तुमचे पैशे खेळवायचे आहेत कि श्रीमंत व्हायचे आहे हे तुम्ही ठरवा !

तुम्हाला काय वाटते ? प्रतिक्रिया कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !

Plan to be rich !

जय पालशेतकर (9773437783)
ग्लोबल इन्वेस्टमेंट

Saturday, 11 March 2017

माझे खर्चिक जीवन आणि इन्वेस्टमेंट

आज मी कुणाला जर विचारल कि मोबाइल कोणता घेशील I- Phone कि Micromax ?

उत्तर काय असेल ?

बाईक कोणती घेशील रॉयल एनफिल्ड Bullet कि होंडा Splendor?

उत्तर काय असेल ?

TV कोणता घेशील 40 इंच LED TV कि 20 इंच ओल्ड TV?

उत्तर काय असेल ?

आज आपण चांगल्या ठिकाणी उठतो बसतो चांगले घड्याळ, चांगले शूज आणि चांगले कपडे तर must आहेतच ना !

चांगले म्हणजे ब्रॅंडेड आणि ब्रँडेड म्हणजे खर्च!

खर्च म्हणजे आज खर्च राहिलेला नाही तर आपल्या जगण्याची पद्धत झालेली आहे. (Lifestyle Expenses)

पण आपण हा खर्च विनाकारण करतो आहोत का?

खर सांगू तर मला नाही वाटत !

Social acceptance हि आज आपली गरज आहे. महागाई सुद्धा वाढली आहे आणि आपाआपल्या कामाप्रमाणे आपल्याला आपले स्टॅंडर्ड मेन्टेन हे करावेच लागतात. (भाई ये कॉर्पोरेट वर्ल्ड हे !)

आपण खर्च रोकु शकतो का?

तर मला पोसिबल वाटत नाही ! (कदाचित काही प्रमाणात कमी करू शकतो)

मग प्रॉब्लम असा आहे कि खर्चिक जीवन आपल्याला फिनॅनसिएल फ्रीडम देईल का?
मुलांचे शिक्षण आणि आपल्या रिटायरमेंटच काय? 

आपल्या फॉरेन टूर्सच काय? आपल्या स्वप्नांच काय?

जगात 99% लोक स्वप्न पाहतात पण ती शेवटपर्यन्त त्यांच्यासाठी स्वप्नच राहतात.
आपल्यालाही आपलं तेच करायचे आहे का?

पण खर्च करून महिन्याला काही पैशे उरतच नसतील मग काय करायचं?
मग सॅविन्ग आणि इन्वेस्टमेंट साठी पैसा आणायचा कुठून ? 

आपण नेहमी महिन्याला एक इन्कम आलं कि त्यातून पहिले खर्च करून पैशे साठवायचा प्रयत्न करतो.
खर्च एवढे होतात कि महिन्याला काही उरतच नाहि!

इनकम - एक्सपेन्स = सेविन्ग

वरील फॉर्म्युला प्रमाणे प्रत्येकाला पैशे साठवावेसे वाटत असतात पण नाईलाज होतो करणार काय?

या साठी मी एक दुसरा सिम्पल फॉर्म्युला वापरतो.

मी महिन्याच्या इनकम मधून पहिले माझे मंथली इन्वेस्टमेंट बाहेर काढतो आणि राहिलेल्या पैशातून खर्च मॅनेज करतो.

इनकम - इन्वेस्टमेंट = एक्सपेन्स

हा फॉर्म्युला खरच जबरदस्त काम करतो.
यातून माझी इन्वेस्टमेंटहि चालू राहते आणि माझे खर्चिक जीवन सुद्धा !

बघा वापरून, महिन्याला ₹ 1000 बाजूला करून तर पहा!

ट्राय करने मी कया जाता हे ?

काय अनुभव आले ते पण नक्की कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !

Plan to be rich !

Monday, 6 March 2017

घर देत का रे कुणी ... घर ?

आपलं राहत घर म्हणजे आपला जिव्हाळ्याचा विषय, घरात काय कुठे असावं ते पासून त्याच इंटेरियर डेकोशन, रंगसंगती घरातील वस्तू यावर आपण विशेष लक्ष देतो.

आता राहत घर म्हणजे स्टेटस सिम्बॉल असल्यामुळे घरावरील आपल्या प्रेमात आणखिनच भर पडली आहे.

आपण राहत घराला आपलं अस्सेट मानतो म्हणूनच मोठं घर घेण्यासाठी आपण अट्टाहास करतो.

1 BHK घर नंतर 2 BHk घर नंतर 3 bhk घर मग काय तर स्टुडिओ अपार्टमेंट !
ये भूक तो मिटती हि नही हे ।

राहत घर मोठं करण्यासाठी आपण मोठी कर्ज घेत राहतो. सत्यनारायण पूजेला लोक वाहवा करतात पण त्यानंतर कर्जाचा डोंगर पार करनार कोण ?

अफकोर्स तुम्ही !

मित्रांनो थांबा ! विचार करा !

आपलं राहत घर खरच अस्सेट असते का ?

उत्तर आहे -- नाही ! कदापि नाही !

कारण कि ते डेड अस्सेट (DEAD ASSET) आहे.

कसं काय ?

समजा तुम्ही आज ज्या घरात राहता ते तुम्ही 10 वर्षांपूर्वी 35 लाखाला विकत घेतले होते. त्याची किंमत आज 1 करोड रुपये झाली आहे किव्वा त्याहून हि जास्त झाली आहे पण याचा अर्थ हे रुपये तुम्ही कमावले असा होत नाही कारण कमवायसाठी तुम्हाला तुमचे राहते घर विकावे लागेल.

त्यामुळे तुम्ही राहते घर कितीही मोठे घेतलेत तरी सुद्धा त्याची Financial Value हि झिरो आहे.

एवढी मोठी कर्ज काढून काय फायदा? (गरज असेल तर ठीक आहे पण नुसतं शो ऑफ करून जीवन घोर करण्यात काय अर्थ आहे ?)

जर तुम्हाला प्रोपार्टीच घ्यायची असेल..

तर राहत घर विकून मोठ घरं घेण्यापेक्षा राहत घर न विकता, दुसरी प्रॉपर्टी घेऊन रेन्ट वर टाकण्यात जास्त फायदा आहे. (दुसरी प्रॉपर्टी तुमचं अस्सेट बनेल)

इमोशनल डेसिजन कधी कधी खूप महागात पडतात.
इमोशन मै कही डीमोशन ना हो जाए !

म्हणूनच लवकर विचार करा आणि लागा प्लान्निंग ला !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !

Plan to be rich !