आपलं राहत घर म्हणजे आपला जिव्हाळ्याचा विषय, घरात काय कुठे असावं ते पासून त्याच इंटेरियर डेकोशन, रंगसंगती घरातील वस्तू यावर आपण विशेष लक्ष देतो.
आता राहत घर म्हणजे स्टेटस सिम्बॉल असल्यामुळे घरावरील आपल्या प्रेमात आणखिनच भर पडली आहे.
आपण राहत घराला आपलं अस्सेट मानतो म्हणूनच मोठं घर घेण्यासाठी आपण अट्टाहास करतो.
1 BHK घर नंतर 2 BHk घर नंतर 3 bhk घर मग काय तर स्टुडिओ अपार्टमेंट !
ये भूक तो मिटती हि नही हे ।
राहत घर मोठं करण्यासाठी आपण मोठी कर्ज घेत राहतो. सत्यनारायण पूजेला लोक वाहवा करतात पण त्यानंतर कर्जाचा डोंगर पार करनार कोण ?
अफकोर्स तुम्ही !
मित्रांनो थांबा ! विचार करा !
आपलं राहत घर खरच अस्सेट असते का ?
उत्तर आहे -- नाही ! कदापि नाही !
कारण कि ते डेड अस्सेट (DEAD ASSET) आहे.
कसं काय ?
समजा तुम्ही आज ज्या घरात राहता ते तुम्ही 10 वर्षांपूर्वी 35 लाखाला विकत घेतले होते. त्याची किंमत आज 1 करोड रुपये झाली आहे किव्वा त्याहून हि जास्त झाली आहे पण याचा अर्थ हे रुपये तुम्ही कमावले असा होत नाही कारण कमवायसाठी तुम्हाला तुमचे राहते घर विकावे लागेल.
त्यामुळे तुम्ही राहते घर कितीही मोठे घेतलेत तरी सुद्धा त्याची Financial Value हि झिरो आहे.
एवढी मोठी कर्ज काढून काय फायदा? (गरज असेल तर ठीक आहे पण नुसतं शो ऑफ करून जीवन घोर करण्यात काय अर्थ आहे ?)
जर तुम्हाला प्रोपार्टीच घ्यायची असेल..
तर राहत घर विकून मोठ घरं घेण्यापेक्षा राहत घर न विकता, दुसरी प्रॉपर्टी घेऊन रेन्ट वर टाकण्यात जास्त फायदा आहे. (दुसरी प्रॉपर्टी तुमचं अस्सेट बनेल)
इमोशनल डेसिजन कधी कधी खूप महागात पडतात.
इमोशन मै कही डीमोशन ना हो जाए !
म्हणूनच लवकर विचार करा आणि लागा प्लान्निंग ला !
प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !
Plan to be rich !
No comments:
Post a Comment