Showing posts with label will. Show all posts
Showing posts with label will. Show all posts

Thursday, 4 May 2017

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैसे मिळतील का?

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैसे मिळतील का? 

जय पालशेतकर (9773437783)
ग्लोबल इन्वेस्टमेंट 

वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Affcource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो ! 

तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक केली असेल पण तुमच्या नंतर हे पैसे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?

'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ? 

तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ? 

तर उत्तर आहे - नाही 

शॉकिंग ? 

खालील उदाहरण पहा ! 

महेश हा 55 वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनि म्हणून ठेवलेली आहे. 

अचानक महेशचा अॅक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मूल संपत्ती साठी कोर्टात गेेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांनमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला ! 

असेे का झाले ? 

महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी हि 'Succesion Law' नुसार झाली आणि सर्व 'Legal Heir' मध्ये  समान वाटणी झाली.

'Succession Law' समजून घ्या !

'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे मालक नाही. 

नॉमिनी अस्सेट ला होल्ड करू शकतो पण अस्सेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात. 

मग 'Legal Heir' कोण असतात?

'Legal Heir' ते असतात जे तुमच्या 'Legal Will' मध्ये तुम्ही मेन्शन करता. 

आणि जर तुम्ही 'legal Will' नाही बनवली आहे तर 'Succesion Law' नुसार तुमचे 'Legal Heir' ठरवले जातात. 

'Succession Law'चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत. 

मित्रानो इन्वेस्टमेंट करणे हि काळाची गरज आहे तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे. 

नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनी ला हवा तेवढा फायदा होणार नाही ! 

'Legal Will' बद्दल आणखीन काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 

प्रतिक्रिया नक्की कळवा !

प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा ! 

Plan to be rich ! 


http://jaypalshetkar.blogspot.in/2017/05/blog-post_4.html?m=1