मी आज काल जेव्हाहि मॉल मध्ये जातोे तेव्हा एक महत्वाची गोष्ट नोटीस करतो. मॉल म्हंटल कि भरपूर सुंदर वस्तू, गॅजेट्स आणि कपडे ठेवलेले असतातच मग काय प्रत्येक जण काही ना काही घेण्यात गुंतलेला असतो, अगदी 'फुल्ल ओंन' खर्च चाललेला असतो आणि या सगळ्याचा शेवट बरेचदा काउंटर वर आपलं क्रेडिट कार्ड सुपूर्त करून होतो.
क्रेडिट कार्ड व EMI संस्कृती आज आपल्या जनरेशनचा पार्ट बनून गेली आहे.
First Buy, pay later !
First Buy, pay later !
क्रेडिट कार्ड किव्वा EMI चांगले कि वाईट हा खरा प्रॉब्लेम नाही आहे तर 'इन्स्टंट ग्राटिफिकेशन' हा आपला प्रॉब्लेम आहे अस मला वाटत.
आपल्या आदिची जनरेशन हि पहिले पैशे सेव्ह करायची नंतर इनवेस्ट करायची मग राहिले तर स्पेंड करायची पण आज आपण पैशे आपल्या अकाऊंट मध्ये येण्या आधीच त्याची विल्हेवाट लावणे योग्य आहे का ?
मी आपण प्लॅन केलेल्या खर्चाबाबत बोलत नाही आहे तर जे आपण असेच न प्लॅन करता करतो किव्वा इन्स्टंट वस्तू घेतो या बाबत बोलतोय.
तुम्ही इन्स्टंट ग्राटिफिकेशन चे शिकार आहात का ? स्वतःला खालील प्रश्न विचारा आणि तुम्हीच पडताळून पहा
1. तुम्ही अश्या वस्तू घेताय का ? ज्याची गरज नाही आहे ! (कदाचित फक्त सेल चालू आहे म्हणून तुम्ही घेताय)
2. तुम्ही इन्वेस्टमेंट फक्त टॅक्स सेव्ह करण्यासाठी करत आहात का ?
3. तुम्ही वस्तू तुमच्या ऑफिसच्या मित्रांनी घेतल्या आहेत म्हणून घेत आहात का ?
4. तुम्हाला सोसायटी ने Accept करावं म्हणून तुम्ही महागड्या वस्तू घेता का?
5. लोकांना तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत असे वाटावे म्हणून खर्च करत आहात का ?
6. ज्या शेअर्स मध्ये तुम्हाला लॉस होतोय ते तुम्ही असेच ठेवले आहेत आणि ज्या मध्ये प्रॉफिट होतोय ते तुम्ही विकत चालले आहात का ?
मित्रांनो विचार करा या इन्स्टंट ग्राटिफिकेशन (Buy Today, Pay Later) मुळेच अमेरिका 'Sub Prime Crisis' मध्ये ढकलली गेली आणि या इन्स्टंट ग्राटिफिकेशनमुळेच तुम्ही कर्जाच्या आणि डिप्रेशनच्या बोज्या खाली दाबले जाल !
आज यात भारताची 'युथ पॉवर' गुंततेय आणि ते भारतासाठी व तुमच्यासाठी नक्कीच योग्य नाही.
आज यात भारताची 'युथ पॉवर' गुंततेय आणि ते भारतासाठी व तुमच्यासाठी नक्कीच योग्य नाही.
सोल्युशन काय ?
1. गरज तपासा, कोणतीही वस्तू घेण्याआधी कमीतकमी ती घेण्याचे तीन चार चांगले स्ट्रॉंग रिजन शोधा !
2. फिनॅनसिएल प्लान्निंग करा, तुम्ही खर्च आपोआप कमी कराल.
3. Instant Buying डिसिजन घेऊ नका थोड थांबा !
4. वस्तू घेताना पैशे Cash मध्ये पे करा !
5. मुलांनी वस्तू मागितल्यावर लगेच देऊ नका !
वरील क्लुप्त्या वापरून पहा आणि तुम्हाला काय वाटते ? प्रतिक्रिया नक्की कळवा !
प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !
Plan to be rich !