Showing posts with label mistake in investing. Show all posts
Showing posts with label mistake in investing. Show all posts

Tuesday, 2 May 2017

'Instant Gratification' भाई ने बोला चाहिये तो चाहिये !


मी आज काल जेव्हाहि मॉल मध्ये जातोे तेव्हा एक महत्वाची गोष्ट नोटीस करतो. मॉल म्हंटल कि भरपूर सुंदर वस्तू, गॅजेट्स आणि कपडे ठेवलेले असतातच मग काय  प्रत्येक जण काही ना काही घेण्यात गुंतलेला असतो, अगदी 'फुल्ल ओंन' खर्च चाललेला असतो आणि या सगळ्याचा शेवट बरेचदा काउंटर वर आपलं क्रेडिट कार्ड सुपूर्त करून होतो.
क्रेडिट कार्ड व EMI संस्कृती आज आपल्या जनरेशनचा पार्ट बनून गेली आहे.
First Buy, pay later !
क्रेडिट कार्ड किव्वा EMI चांगले कि वाईट हा खरा प्रॉब्लेम नाही आहे तर 'इन्स्टंट ग्राटिफिकेशन' हा आपला प्रॉब्लेम आहे अस मला वाटत.
आपल्या आदिची जनरेशन हि पहिले पैशे सेव्ह करायची नंतर इनवेस्ट करायची मग राहिले तर स्पेंड करायची पण आज आपण पैशे आपल्या अकाऊंट मध्ये येण्या आधीच त्याची विल्हेवाट लावणे योग्य आहे का ?
मी आपण प्लॅन केलेल्या खर्चाबाबत बोलत नाही आहे तर जे आपण असेच न प्लॅन करता करतो किव्वा इन्स्टंट वस्तू घेतो या बाबत बोलतोय.
तुम्ही इन्स्टंट ग्राटिफिकेशन चे शिकार आहात का ? स्वतःला खालील प्रश्न विचारा आणि तुम्हीच पडताळून पहा
1. तुम्ही अश्या वस्तू घेताय का ? ज्याची गरज नाही आहे ! (कदाचित फक्त सेल चालू आहे म्हणून तुम्ही घेताय)
2. तुम्ही इन्वेस्टमेंट फक्त टॅक्स सेव्ह करण्यासाठी करत आहात का ?
3. तुम्ही वस्तू तुमच्या ऑफिसच्या मित्रांनी घेतल्या आहेत म्हणून घेत आहात का ?
4. तुम्हाला सोसायटी ने Accept करावं म्हणून तुम्ही महागड्या वस्तू घेता का?
5. लोकांना तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत असे वाटावे म्हणून खर्च करत आहात का ?
6. ज्या शेअर्स मध्ये तुम्हाला लॉस होतोय ते तुम्ही असेच ठेवले आहेत आणि ज्या मध्ये प्रॉफिट होतोय ते तुम्ही विकत चालले आहात का ?
मित्रांनो विचार करा या इन्स्टंट ग्राटिफिकेशन (Buy Today, Pay Later)  मुळेच अमेरिका 'Sub Prime Crisis' मध्ये ढकलली गेली आणि या इन्स्टंट ग्राटिफिकेशनमुळेच तुम्ही कर्जाच्या आणि डिप्रेशनच्या बोज्या खाली दाबले जाल !
आज यात भारताची 'युथ पॉवर' गुंततेय आणि ते भारतासाठी व तुमच्यासाठी नक्कीच योग्य नाही. 
सोल्युशन काय ?
1. गरज तपासा, कोणतीही वस्तू घेण्याआधी कमीतकमी ती घेण्याचे तीन चार चांगले स्ट्रॉंग रिजन शोधा !
2. फिनॅनसिएल प्लान्निंग करा, तुम्ही  खर्च आपोआप कमी कराल.
3. Instant Buying डिसिजन घेऊ नका थोड थांबा !
4. वस्तू घेताना पैशे Cash मध्ये पे करा !
5. मुलांनी वस्तू मागितल्यावर लगेच देऊ नका !
वरील क्लुप्त्या वापरून पहा आणि तुम्हाला काय वाटते ? प्रतिक्रिया नक्की कळवा !
प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !
Plan to be rich !

Monday, 1 May 2017

तुम्ही पैशाला अर्थ जोडताय का ?

माझा मित्र आणि मी नवीन मोबाइल घेण्यासाठी शॉप मध्ये शिरलो, मित्राला एक ₹30000/-  चा फोन आवडला, तरी त्यानी त्याच्या दुसऱ्या मित्राला फोन लावला कारण हाच फोन त्याचा मित्र 2 दिवसापासून वापरत होता.
परफॉर्मन्स बद्दल खात्री झाल्यावर त्याने मित्राला कॉस्ट विचारली, त्याने तो मोबाइल  जवळच्या दुकानातून ₹ 29850/- ला विकत घेतला असे सांगितले.
मित्र लगेच बिलिंग काउंटर वर उभा राहिला. मी त्याला विचारलं "अरे त्याने तो मोबाइल तुझ्यापेक्षा कमी मध्ये 2 दिवसापूर्वी घेतला आहे. तू का ना नाही त्याने मोबाइल घेतलेल्या दुकानात जात तुझे ₹150/- वाचतील आणि दुकांनहि जवळ आहे !" 
तो म्हणाला "इट्स ओके यार ! ₹ 150 मध्ये कुठे बंगला बांधणार आहे" आणि हसत पेमेंट करून टाकलं.
काही दिवसांनी आम्ही असच बाहेर पडलो मित्राला पेंन ड्राईव्ह घ्यायचे होते. आम्ही जवळपास 5-6 दुकानात फिरलो प्रत्येक वेळी मित्र पेन ड्राईव्ह ची कॉस्ट विचारून बाहेर पडत होता. मी वैतागलो "म्हटलं काय चाललंय ?" मित्रांनि सांगितलं "अरे सगळे ₹300/- भाव बोलत आहेत आणि त्याच्या कुणा मित्रांनी तो पेन ड्राईव्ह ₹200/- ला घेतला होता."
म्हणजे मित्राचा ₹100/- वाचवण्यासाठी हा खटाटोप चालू होता. आणि काही दिवसांपूर्वी हाच माझा मित्र ₹150 एक्स्ट्रा देऊन आरामात मोबाइल घेऊन आला.
अस कस शक्य आहे ?
कारण ₹30000 वर ₹ 150 म्हणजे 0.05% आहेत आणि ते काहीच मोठे वाटत नाही पण जेव्हा ₹ 300 वर ₹ 100 म्हणजे 33.33% ची आपण वार्ता करतो तेव्हा मात्र ₹100 फार मोठे आणि अनाठायी खर्च वाटतो.
खर तर पैशे हे पैशे असतात, ₹ 150 हे हि तेवढेच महत्वाचे होते पण मित्राने त्याला आपले अर्थ लावले.
यालाच Mental Accounting म्हंटल जात आणि जवळपास 99% लोक याचा बळी जातात.
आपणच पैशाला अर्थ लावतो, त्याला आपण सेफ पैशे किव्वा रिस्की पैशे अस विभाजन करतो ! हे आपण हे पैशे कुठून आले आहेत यावर ठरवतो !
चला एक उदाहरण घेऊ !
A. तुमची सॅलरी - ₹50000
B. तुम्हाला लॉटरी लागली - ₹50000
C. तुम्हाला बोनस मिळाला - ₹50000
तुम्ही कोणत्या पैशावर आरामात रिस्क घेउ शकाल?
उत्तर - ऑप्शन B वर त्यानंतर ऑप्शन C वर नंतर ऑप्शन A वर बरोबर ?
हे तिन्ही ऑप्शन मधून ₹50000/- च मिळाले आहेत. पण आपण त्यांना ते कुठून मिळाले आहेत या बेसिस वर रिस्की किव्वा सेफ ऑप्शन बनवलं, आहे कि नाही गंमत !
पैशाला अर्थ लावणे चुकीचे आहे. पैशे कुठूनही येवोत, प्रत्येक पैसा हा पैसा आहे आणि तो संभाळूनच वापरणें महत्वाचे !
तुम्हाला काय वाटते ? प्रतिक्रिया नक्की कळवा !
प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !
Plan to be rich !