Showing posts with label Mobile buying. Show all posts
Showing posts with label Mobile buying. Show all posts

Monday, 1 May 2017

तुम्ही पैशाला अर्थ जोडताय का ?

माझा मित्र आणि मी नवीन मोबाइल घेण्यासाठी शॉप मध्ये शिरलो, मित्राला एक ₹30000/-  चा फोन आवडला, तरी त्यानी त्याच्या दुसऱ्या मित्राला फोन लावला कारण हाच फोन त्याचा मित्र 2 दिवसापासून वापरत होता.
परफॉर्मन्स बद्दल खात्री झाल्यावर त्याने मित्राला कॉस्ट विचारली, त्याने तो मोबाइल  जवळच्या दुकानातून ₹ 29850/- ला विकत घेतला असे सांगितले.
मित्र लगेच बिलिंग काउंटर वर उभा राहिला. मी त्याला विचारलं "अरे त्याने तो मोबाइल तुझ्यापेक्षा कमी मध्ये 2 दिवसापूर्वी घेतला आहे. तू का ना नाही त्याने मोबाइल घेतलेल्या दुकानात जात तुझे ₹150/- वाचतील आणि दुकांनहि जवळ आहे !" 
तो म्हणाला "इट्स ओके यार ! ₹ 150 मध्ये कुठे बंगला बांधणार आहे" आणि हसत पेमेंट करून टाकलं.
काही दिवसांनी आम्ही असच बाहेर पडलो मित्राला पेंन ड्राईव्ह घ्यायचे होते. आम्ही जवळपास 5-6 दुकानात फिरलो प्रत्येक वेळी मित्र पेन ड्राईव्ह ची कॉस्ट विचारून बाहेर पडत होता. मी वैतागलो "म्हटलं काय चाललंय ?" मित्रांनि सांगितलं "अरे सगळे ₹300/- भाव बोलत आहेत आणि त्याच्या कुणा मित्रांनी तो पेन ड्राईव्ह ₹200/- ला घेतला होता."
म्हणजे मित्राचा ₹100/- वाचवण्यासाठी हा खटाटोप चालू होता. आणि काही दिवसांपूर्वी हाच माझा मित्र ₹150 एक्स्ट्रा देऊन आरामात मोबाइल घेऊन आला.
अस कस शक्य आहे ?
कारण ₹30000 वर ₹ 150 म्हणजे 0.05% आहेत आणि ते काहीच मोठे वाटत नाही पण जेव्हा ₹ 300 वर ₹ 100 म्हणजे 33.33% ची आपण वार्ता करतो तेव्हा मात्र ₹100 फार मोठे आणि अनाठायी खर्च वाटतो.
खर तर पैशे हे पैशे असतात, ₹ 150 हे हि तेवढेच महत्वाचे होते पण मित्राने त्याला आपले अर्थ लावले.
यालाच Mental Accounting म्हंटल जात आणि जवळपास 99% लोक याचा बळी जातात.
आपणच पैशाला अर्थ लावतो, त्याला आपण सेफ पैशे किव्वा रिस्की पैशे अस विभाजन करतो ! हे आपण हे पैशे कुठून आले आहेत यावर ठरवतो !
चला एक उदाहरण घेऊ !
A. तुमची सॅलरी - ₹50000
B. तुम्हाला लॉटरी लागली - ₹50000
C. तुम्हाला बोनस मिळाला - ₹50000
तुम्ही कोणत्या पैशावर आरामात रिस्क घेउ शकाल?
उत्तर - ऑप्शन B वर त्यानंतर ऑप्शन C वर नंतर ऑप्शन A वर बरोबर ?
हे तिन्ही ऑप्शन मधून ₹50000/- च मिळाले आहेत. पण आपण त्यांना ते कुठून मिळाले आहेत या बेसिस वर रिस्की किव्वा सेफ ऑप्शन बनवलं, आहे कि नाही गंमत !
पैशाला अर्थ लावणे चुकीचे आहे. पैशे कुठूनही येवोत, प्रत्येक पैसा हा पैसा आहे आणि तो संभाळूनच वापरणें महत्वाचे !
तुम्हाला काय वाटते ? प्रतिक्रिया नक्की कळवा !
प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !
Plan to be rich !